- लसीकरण केंद्रांची संख्या घटली; नागरिकांची उडणार धावपळ..
- ठराविक २० केंद्रांवरच लसीकरणाची सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात उद्या गुरुवारी (दि. ०८) रोजी ‘कोव्हिशील्ड’ १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त पहिला डोस हा १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी स्लॉट बुकींग ओपन होईल.
अंकुशरावलांडगे नाटयगृह, भोसरी, कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या ८ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत २०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ प्रेमलोक पार्क दवाखाना या आठ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीतपहिला डोस १०० व दुसरा डोस १०० या लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल. वय ४५ वर्षावरील लाभार्थी यांचे लसीकरण हे केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पध्दतीने करण्यात येईल.
तसेच उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
उद्या ‘कोव्हॉक्सीन’ वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निळु फुले नाटयगृह, सांगवी स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत पहिला डोस १०० व दुसरा डोस १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने देण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर उद्या गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील. लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल, त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.