- सहा लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- दिघीतील दत्तनगर येथील रो हाऊसमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातून १५२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख ४४ हजार १९१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
ही घटना १४ एप्रिल ते १८ जून या कालावधीत घडली. दत्तात्रय निवृत्ती लोखंडे (वय ६०, रा. दत्तगडनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.