- या रूग्णालयाला पालिकेचा २५ हजारांचा दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- ‘ क ‘ क्षेत्रीय आरोग्य विभागाने चिखली मोशी रस्त्यावर रूग्णालयीन कचरा टाकल्याबद्दल मून रूग्णालयावर २५ हजार रूपये दंडाची कारवाई केली.
आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॅा के अनिल रॅाय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे,सहाय्यक आरोग्य अधिकारी बी बी कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, आरोग्य निरीक्षक वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
















