- मृतांच्या नातेवाईकांना चिखलातून ओढवा लागतोय मृतदेह..
- पतित पावन संघटनेकडून घटनेचा तीव्र निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील शवागृह (डेड हाउस) शेजारी बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर व बांधकामाच्या पाण्यामुळे चिखल होतोय. मृतांच्या नातेवाईकांना या चिखलातून पायी जाताना व रुग्णवाहिका आत नेताना मोठी कसरत करावी लागतेय.
चिखलामुळे रुग्णवाहिका आत न्यायलाही रुग्णवाहिका चालक तयार होत नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृतदेह स्वतः चिखलातून ओढत न्यावा लागत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग व प्रशासनाचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. पतित पावन संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, हा रस्ता सुरळीत करण्याची व रुग्णवाहिका चालकांवर कारवाईची आयुक्तांकडे मागणी केली आहे.


















