- भोसरीच्या लांडेवाडी दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- भोसरीतील लांडेवाडीतील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १४ येथे नावाशी साधर्म्य असलेल्या बोगस व्यक्तीला उभे करून तो व्यक्तीच फिर्यादी आहे, असे भासवून फिर्यादी यांच्या नावाचे बनावट पॅनकार्ड बनवले. खोटा फोटो देऊन बनावट खरेदीखत तयार केले. खरेदी खतावर साक्षीदार म्हणून दोघांच्या सह्या केल्या.
बोगस खरेदीखत मामुर्डी तलाठी कार्यालयात देऊन त्याआधारे मौजे मामुर्डी, तालुका हवेली येथील गट नंबर १५ / ३ अ / ८ मधील प्लॉट नंबर ३६, ३७ ही मिळकत आरोपीने स्वतःच्या नावावर करून घेतली. ही घटना ८ डिसेंबर २०१७ ते २ मार्च २०२१ या कालावधीत मामुर्डी येथे घडली.
उत्तम बुधन ओरसे (रा. जनवाडी, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश आप्पासाहेब कांबळे (रा. गहुंजे), निखिल राजू बागल (रा. देहूरोड), दयानंद नानासाहेब सरवदे (रा. चांदखेड, ता. मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.