- अज्ञात चोरट्याने पितळेचे कळस केले लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८. जुलै. २०२१) :- पिंपळे निलख येथील नवयुग कालिकादेवी मंदिरात अज्ञात चोरट्याने चार हजार रुपये किमतीचे दोन पितळेचे कळस चोरून नेले आहेत.
ही घटना सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजता मंदिरात घडली. सुर्यकांत शंकरआप्पा पांचाळ (वय ४६, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
















