- चिखली घरकुल इमारतीतील सदनिकांचा घेतला अनधिकृतपणे ताबा..
- नगरसेविकेच्या पतीसह २४ जणांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- महापालिकेच्या वतीने साकारलेल्या चिखली घरकुल प्रकल्पाच्या निर्माणाधीन इमारतीतील ४२ सदनिकांचा अनधिकृतपणे ताबा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी २४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांच्या पतीचाही समावेश आहे.
महापालिका आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी चिखली येथे घरकुल प्रकल्पाची निर्मिती करत आहे. इमारतीच्या पूर्णत्वानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे लाभार्थ्यांना हस्तांतरण केले जात आहे. डी -१२ या इमारतीचे बांधकाम सुरु असताना यातील ४२ सदनिकांचा ताबा नागरिकांनी घेतला आहे. महापालिका अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रकल्पात घुसखोरी केली आहे. या प्रकरणी गजानन मारुती गावडे (वय ३७, रा . धायरी, पुणे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भाजपच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी बोबडे यांचे पती भीमा बोबडे, युवराज सूर्यभान कोकाटे (रा. नेवाळेवस्ती), अशोक रामभाऊ धोंडे, धन्यकुमार अंकुशराव पुजारी, मंगला अरुण कोंढारे, निवृत्ती कृष्णा पवार, अर्चना संजय कांबळे, भगवान लिंबाजी लांडगे, सुशीला शशिकांत मावरकर, विजय बळीराम गायकवाड, भगवान दगडु कांबळे, वसंत लक्ष्मण गुरव, सुर्यकांत मल्लाप्पा बनसोडे, शिवाजी हनुमंत जाधव, नवनाथ रामचंद्र फडतरे, विजय नारायण जोगदंड, बालाजी गोरोबा शिखरे, बालाजी विश्वनाथ गायकवाड, अशोक सखाराम चव्हाण, भिकु महादेव कोहाडे, देवानंद सदाशिव खांबे, सुरेंट विबकराव ढोणे, रवीट माणिकराव बोरकर, व्यंकटी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक तौफीक सय्यद अधिक तपास करत आहेत.