न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- दिघी रोड, भोसरीतील गंगोत्री पार्कमध्ये दुर्गामाता मंदिरात शनिवारी रात्री नऊ ते रविवारी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडून त्यातून एक हजार ४०० रुपयांची रक्कम चोरून नेली.
कैलाशचन्द्र भैरुलाल शर्मा (वय ६२, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.


















