- चिंचवडमधील घटना; तिघांविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- फोर्स मोटर्स कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरी लावण्यासाठी वारंवार आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना गुगल पे आणि फोन पे वरून ऑनलाईन माध्यमातून एक लाख ४४ हजार रुपये ट्रान्सफर केले.
त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींकडे नोकरीबाबत विचारणा केली असता आरोपींनी नोकरी न लावता, पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना २६ सप्टेंबर २०२० ते २५ मार्च २०२१ या कालावधीत थरमॅक्स चौक चिंचवड येथे घडली.
पलाश गणेशराव मौजे (वय २८, रा. सहकार नगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत रविवारी (दि. २५) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक जाधव उर्फ यादव (वय ४०), जीवन गायकवाड (वय ३५), पाटील (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही, वय ३८) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.