- उपायुक्त संदीप खोत व अण्णा बोदडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- महापालिकेत बदल्यांचे सत्र सुरूच असून आता उपायुक्त, सहायक आयुक्तांच्या कामकाजात फेरबदल केले आहेत. शिक्षण, आरोग्य या प्रमुख दोन विभागांची धुरा उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे, तर ‘क’ क्षेत्रीय अधिकारीपदासह माहिती जनसंपर्क विभागाचा कार्यभार अण्णा बोदडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
घनकचरा व्यवस्थापन निर्मल अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, विलगीकरण आणि घनकचऱ्याचे कचरा परिणामकारक व्यवस्थापक व सनियंत्रण करणे या महत्त्वपूर्ण कामांसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या कामी क्रीडा विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांची निवड केली आहे. आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागासह शिक्षण, प्राथमिक, आरोग्य विभागाचीही जबाबदारी खोत यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले.
सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांच्याकडील माहिती जनसंपर्क आले आहे. त्या विभागाचा कार्यभार काढून घेत त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग, पशुवैद्यकीय विभाग सोपविला आहे. क प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांना झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागासह दिव्यांग कक्ष, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक आयुक्त म्हणून पदभार देण्यात आला आहे. सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांची क्रीडा विभाग, विजयकुमार थोरात यांची क्षेत्रीय कार्यालय आणि अभिजित हराळे यांची करसंकलन विभागात बदली करण्यात आली आहे.


















