- पाण्यात विज उतरून ३ मेढ्यांचा मृत्यू..
- सामजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकिरांची महावितरणाकडे धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- महावितरणाकडून भुमीअंतर्गत केबल तुटल्याने तात्पुरते जुगाड म्हणून थ्री फेज केबल सर्व्हिस वायर ओव्हर हेड टाकून कामचलाऊ पद्धत अवलंबविली जात आहे. या कामचलाऊ पद्धतीमुळे काळेवाडीतील आझाद चौक येथे पाण्यात विज उतरून परिसरातील मेंढपाळाच्या ३ मेंढ्या मरण पावल्या आहेत. पुढील धोका ओळखून या प्रकरणाची दखल घेत, सामाजीक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांनी पिंपरीतील महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर यांची भेट घेतली. परिसरातील ओव्हर हेड वायर व नादुरूस्त मिनी डी. पी. बॉक्स तातडीने बदलण्याबाबत त्यांना निवेदन दिले.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाचे दिवस आहेत. महापालिकेचे परिसरात ड्रेनेज, पाणी, स्ट्राँम वॉटर पाईप लाईन तसेच रस्त्याचे कामं चालु आहेत. त्यात भुमीअंतर्गत केबल तुटल्याने तात्पुरती थ्री फेज केबल सर्व्हिस वायर ओव्हर हेड टाकल्या आहेत. यामुळे दुर्घटना घडून मागे हाकनाक एका मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे.
त्यातच (दि. २२) दुर्देवाने आझाद चौक येथे पाण्यात विज उतरल्याने मेंढपाळाच्या ३ मेंढ्या मरण पावल्या आहेत. त्यामुळे महावितरणाने परिसरातील नादुरूस्त मिनी डी. पी. बॉक्स व ओव्हर हेड सर्व वायर्स हटवून नव्याने बसवाव्यात. त्यामुळे नागरिकांवरील टांगती तलवार काढुन त्यांना मोकळा श्वास मिळेल, असे या निवेदनात तापकीर यांनी म्हटले आहे.


















