- ‘कोविशिल्ड’ व ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा डोस मोफत उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. २७) रोजी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. प्रत्येक कोविड-१९ लसीकरण केंद्रावर एकुण ३०० लाभार्थीक्षमते इतका डोस दिला जाईल. या अनुषंगाने कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड येथे डोस मिळेल.
पहिला डोस हा ५० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १०० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दूसरा डोस हा १०० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ५० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीयKIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
तसेच उद्या ‘कोविशिल्ड’लसीचा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांना फक्त पहिला डोस हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या साई अंब्रेला, संभाजीनगर दवाखाना, संजयकाळे सभागृह (पॅनअर्थो रुग्णालयासमोर), घरकुल दवाखाना चिखली रुपीनगर ठाकरे शाळा प्राथमिक शाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती भानसे स्कुल, यमुनानगर तळवडे समाज मंदीर शाळा नेहरुनगर उर्दु शाळा मनपा शाळा खराळवाडी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रयणी नगर, भोसरी सखुबाई गार्डन, भोसरी सावित्रीबाईफुले, प्रायमरी स्कुल,मोशी दवाखाना छञपतीशाहु महाराज प्राथमिक विद्यालय,दिघी(सी एस एम) पंडित जवाहरलालनेहरुशाळा, च-होली पिं.चिं.म.न.पा. शाळा बोपखेल सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा, भूमकरवस्ती मारुती गेणु कस्पटे प्राथमिक शाळा, कस्पटेवस्ती वाकड कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर, थेरगांव गणेश इंग्लिश स्कुल, दापोडी पिंपळे गुरवमाध्यमिक शाळा निळुफुले नाटयगृह, पिंपळे गुरव अण्णासाहेब मगर शाळा, पिंपळे सौदागर नताशा आय क्लिनिक, पिंपळे सौदागर काकाज इंटरनॅशनल स्कुल, तापकिर मळा, काळेवाडी मनपा शाळा किवळे बिजलीनगर दवाखाना बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे मनपा शाळा वाल्हेकरवाडी या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर- ज्यांनी कोविन अॅपवर १०० टक्के ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेले आहे अशांना २०० लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
तसेच फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोविशिल्ड’लसीचापहिलाडोसवदुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हेगडेवार जलतरण तलावशेजारी इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड आर.टी.टी.सीसेंटर पिं.चिं. मनपा. शाळा जाधववाडी पिं.चिं. मनपा. कन्या शाळा,चिखली स्केटींग ग्राऊंड, सेक्टर नं.२१ यमुनानगर स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर नुतन शाळा, ताम्हाणेवस्ती दिनदयाल शाळा पवना बॅक मागे, संत तुकाराम नगर पिंपरी मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल क्वालिटीसर्कल, भोसरी गंगोत्रीपार्क, दिघी पिं.चिं.मनपा शाळा वाकड पिं.चिं.मनपा यशवंतराव प्राथमिक शाळा, ग प्रभाग कासारवाडीदवाखाना शंकुतलाशितोळे शाळा,वेताळ महाराज सोसायटी, जुनी सांगवी बालाजीलॉन्स, नदी शेजारी जुनी सांगवी. पिं.चिं.म.न.पा.शाळा, पवनानगर, काळेवाडी पिं.चिं. मनपा. शाळा राहटणी कर्मवीर भाऊराव पाटील, पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन सेक्टर नं.२९, आठवडाबाजाराजवळ, रावेत प्रेमलोक पार्क दवाखाना या लसीकरण केंद्रांवर सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपनोंदणीव्दारे सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत एकुण २०० लाभार्थी (पहिला डोस ५० व दुसरा डोस १५०) क्षमतेने लसीकरण करण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० क्षमतेने देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालय जुने जिजामाता रुग्णालय स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पीटल, चिंचवड या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत एकुण २०० लाभार्थी क्षमतेने देण्यात येईल. त्यापैकी १८० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप नोंदणीव्दारे करण्यात येईल. तसेच प्रायोगिक तत्वावर पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या २० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
तसेच गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरणासाठी सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगररुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.


















