- आज १४२ जणांना बाधा; दोघांचा मृत्यू तर, ३३७ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. २६) रोजी १४२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २६३६१३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५८२३९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४३३५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०२ एवढी आहे.


















