न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जुने जिजामाता रूग्णालय, कमला नेहरू शाळा, पिंपरी येथुन, नविन जिजामाता रुग्णालयात (जयहिंद शाळे समोर, पिंपरी) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
या नवीन जिजामाता रुग्णालयाचे उदघाटन आणि दिपपज्वलन नगरसेवक डब्बु आसवानी, संदीप वाघेरे, उषाताई वाघेरे, निकिता कदम, डॉ. पवन साळवे (अतिरिक्त आरोग्य अधिकारी), डॉ. संगिता तिरुमणि (जेष्ठ वैद्यकीय अधिकारी- जिजामाता रूग्णालय), डॉ शैलजा भावसार, (जेष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय), डॉ बाळासाहेब होडगर ( जेष्ठ वैद्यकीय अधिकारी), डॉ वीणा गंभीर, यांच्या हस्ते करण्यात आले.
आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार, जुने जिजामाता रुग्णालय नवनिर्मित ईमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. ओ. पी. डी. विभाग, प्रयोगशाळा दि. २६/७/२०२१ व आय. पी. डी. विभाग दि. २४/७/२०२१ सुरू करण्यात आले आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेने केले.


















