न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२१) :- दोन दिवसांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी काळेवाडी येथील नदी पात्रात मृतदेह आढळून आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत, पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दीपक हरिचंद्र खंडारे (वय ३२, रा. भाटनगर, पिंपरी), असे मृत तरुणाचे नाव आहे.


















