- महाड, चिपळूणसह सांगली कोल्हापूरला साहित्यांचे २६ माल ट्रक रवाना..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर मध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तब्बल २६ ट्रक घेऊन आमदार लांडगे रवाना झाले आहेत. आपत्तीग्रस्त गावात स्वतः उपस्थितीत राहून मदत करीत आहेत. त्यामुळे “आस्मानी संकटात सापडलेल्या कोकणवासीयांच्या मदतीला पश्चिम महाराष्ट्राचा सुपुत्र धावला” अशा भावना पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केले आहेत.
कोकणातील महाड व चिपळूण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापुर इथे गेल्या आठवडाभरापासून महापुराने मोठे नुकसान झाले आहे. चहुबाजूंनी वेढलेल्या संकटाचा सामना हे आपले बांधव करीत आहेत यांना सावरण्यासाठी आमदार लांडगे यांनी एक हात मदतीचा, असे आवाहन करीत लोकसहभागातून खारीचा वाटा उचलला आहे.
आमदार लांडगे यांनी केलेल्या आवाहनानुसार तब्बल २६ ट्रक साहित्य जमा झाले आहे. प्रत्येक ट्रकमध्ये सुमारे ६ टन साहित्य आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू, किराणा, लहान मुलांचे कपडे आणि अशा गोष्टींचा समावेश आहे. हे साहित्य घेऊन गाड्या आज रवाना झाल्या. भोसरीतील महेश लांडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून हे साहित्य पूरग्रस्त बांधवांसाठी सुपूर्त करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्ते संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.