- बळजबरीने गर्भपात; जीवे मारण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. आपण दोघे नवरा बायको आहोत, असे सांगून फिर्यादीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे फिर्यादी गर्भवती राहिली. लग्नाच्या अगोदर मूल होणे बरे नाही, असे बोलून आरोपीने फिर्यादीला दवाखान्यात नेले. कागदोपत्री आपण नवरा बायको आहोत, असे लिहून देत आरोपीने डाॅक्टरांनाही खोटे सांगून फिर्यादीचा गर्भपात केला. आमच्या घरचे तुला स्वीकारणार नाहीत, असे म्हणून आरोपीने लग्नास नकार देत फिर्यादीची फसवणूक केली.
आरोपी गोदे याचा नातेवाईक असलेला आरोपी फटाते याने फिर्यादीला धमकावले. तू जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुला जीवे ठार मारू, अशी धमकी आरोपी फटाते याने फिर्यादीला दिली. देहूगाव येथे २० जुलैला रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. २७) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सोमनाथ मारुती गोदे (वय ३६, रा. जाधववाडी, चिखली), राजेंद्र फटाते (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), अशी आरोपींची नावे आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.















