- भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- फिर्यादीचा मुलगा संकेत विजय शेळके (वय २४) आणि फिर्यादी यांचा भाचा नीलेश पुंडलिक मोरे (वय २४, रा. मोईपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे) यांना नोकरी लावतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर शीतलबाग, भोसरी येथे फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख रुपये रोख रक्कम स्वीकारली. त्यानंतर १२ लाख ९५ हजार रुपये बँक खात्यावरून आरोपींनी घेतले. एकूण २१ लाख ९५ हजार रुपये घेऊन फिर्यादीचा मुलगा आणि भाच्याला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
भोसरी येथे २०१८ पासून १५ जानेवारी २०२० या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला. संतोष सुयस सुतार (रा. शीतलबाग सोसायटी, भोसरी), ज्ञानेश्वर धनवडे (रा. खारघर, नवी मुंबई), विलास गोपाळ गमरे (रा. सिद्धार्थनगर, ठाणे), अशी आरोपींची नावे आहेत. विजय सदानंद शेळके (वय ४९, रा. आरडे, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २८) फिर्याद दिली.















