- कर संकलन विभागाच्या ‘स्टंटबाज’ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- महापालिका कर संकलन विभागाच्या अधिकारी स्मीता झगडे यांनी टाटा मोटर्स कंपनीवर कारवाई केली. त्याची प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी करीत ‘स्टंटबाजी’ केली. यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाली आहे. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकारी झगडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी केली आहे.
टाटा मोटर्स कंपनीने वाढीव बांधकामाची नोंद केली नाही म्हणून मिळकतकर वसुलीसाठी नोटीस दिल्याच्या प्रकऱणात महापालिकेतील सत्ताधारी भाजपा नगरसेवक आक्रमक झाले आहेत. गुरूवारी ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपा नगरसेवक आणि नगरसेविका निषेधाचे फलक हातात घेवून सभेत सहभागी झाले. मिळकतकर विभाग प्रमुख स्मिता झगडे यांनी केवळ प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
शहराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असलेल्या टाटा कंपनीची नाहक बदनामी केल्या प्रकऱणात श्रीमती झगडे यांच्यावर कारवाई म्हणून त्यांना पुन्हा शासकीय सेवेत मागणी नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने सर्वसाधारण सभेनंतर महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून केली.


















