न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. २९ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २९) रोजी १७५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २६४१९८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २५९०७० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४३४१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०३ एवढी आहे.
















