- दुकानदाराला मारहाण, पैसेही लांबविले; एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- पिंपरीतील नेहरुनगरच्या बारामती ॲग्रो सुपर चिकन सेंटरमध्ये चिकन खरेदी करण्यासाठी आलेल्या आरोपीकडे चिकन खरेदी केल्यानंतर फिर्यादी दुकानदाराने पैसे मागितले. या कारणावरून आरोपीने फिर्यादी दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केली.
दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. चिकन घेण्यासाठी आलेल्या अन्य ग्राहकांना पुढे आल्यास दगडाने मारण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानातील कॅश काऊंटरमधून १००० रूपये जबरदस्तीने चोरून नेले.
हा प्रकार गुरुवारी (दि. २९) दुपारी तीन वाजता घडला. महादेव मच्छिंद्र चौबे (वय ३५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दीपक सुरेश मोहिते (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.