- काळभोरनगर मधील घटना; तरून अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- पीडित तरुणी गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास काळभोरनगर पिंपरी येथून जात होती. त्यावेळी आरोपीने तिला रस्त्यात अडवले व प्रेमासाठी प्रपोज केले. मात्र, तिने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करत विनयभंग केला.
तसेच फिर्यादी व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. आकाश भीमराव सावंत (वय २४, रा. सुदर्शन चौक लिलाबाई सावंत चाळ, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने गुरुवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.