- अज्ञात चोरट्याने दानपेटीचे कुलूप तोडून रोकड केली लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२१) :- हिंजवडीचे ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर येथील दानपेटीचे कुलूप दोन चोरट्यांनी तोडले. त्यानंतर दानपेटीतील १७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. २९) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.
मुराजी नारायण वाघमारे (वय ५०, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, हिंजवडी गावठाण) यांनी गुरुवारी (दि. २९) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.