न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- इंद्रायणीनगर भोसरी येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला.
चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. मात्र, चोरट्यांना मशीनमधून रोकड चोरता आली नाही. दुपारी तीन वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.