- दिवाणी, फौजदारी व इतर प्रलंबित तडजोड प्रकरणे निकाली निघणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांसाठी रविवारी (दि. १) लोक अदालत घेण्यात येणार आहे. यामध्ये तडजोड झाल्यानंतर थकबाकीसह संपूर्ण कर एकरकमी भरल्यानंतर भरणा दिनांकापर्यंत विलंब दंड रकमेच्या ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त स्मिता झगडे यांनी गुरुवारी दिली.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व इतर प्रलंबित तडजोड प्रकरणे घरपट्टी, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणी न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो. थकबाकीदार मिळकतधारकाकडून वर्षानुवर्षे मिळकतकराचा भरणा होणे तसेच, मिळकतकराच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशी प्रकरणे तडजोडीसाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दाखल करण्यात येणार आहे.
निगडी, प्राधिकरण विभागीय कार्यालय व आकुर्डीतील अदालत विषयक दिवाणी व फौजदारी येथे लोकअदालत होणार आहे. लोकअदालती अंतर्गत तडजोडीकरिता ५०० थकबाकीदारांना नोटीस देण्यात आली आहे.