- फक्त ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा मोफत डोस उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- कोव्हॉक्सीन’ लसीचा उद्या रविवारी (दि. ०१ ऑगस्ट) रोजी वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, जुने जिजामाता रुग्णालय येथे ९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दूसरा डोस हा ९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.
‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षा पुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कै. ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, यमुनानगर रुग्णालय, निगडी, अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा या लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल. पहिला डोस हा ९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा ९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही.