- पालिकेच्या शिक्षण समितीचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- कोरोनाच्या काळात विद्यार्थिनींना कोरोना संसर्गापासून बचावासाठी ‘ गुडफिल किट ‘ देण्याचे शिक्षण समितीने ठरविले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत.
गुडफिल उत्पादनाचा उपयोग विद्यार्थिनींना शाळा बंद असल्या तरीदेखील घरी राहुनही होणार आहे. या किटमध्ये अंडरगारमेंट व २ मास्कचा समावेश आहे. किटची किंमत १६९९ रुपये देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये अंदाजे २५ हजार विद्यार्थिनींना या किटचा उपयोग होणार आहे. शिक्षण समितीने विद्यार्थिनींना या किटचे वाटप करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात आली असून, लवकरच विद्यार्थिनींना गुडफिल किटचे वाटप करण्यात येईल.