- सोनाराकडून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- चिंचवडगावातील प्रियंका ज्वेलर्समध्ये आरोपींनी ११ जून रोजी फिर्यादीच्या दुकानात येऊन सोन्याच्या दागिन्यांची मोड दिली होती. ते दागिने वितळवल्यावर त्यातील सोन्याचे वजन कमी भरले. त्यानंतर २२ जून रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन सोनेरी रंगाची दिसणारी एक अंगठी सोने आहे असे भासवून फिर्यादी यांना दिली. त्यापोटी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ३५ हजार रुपये फसवणूक करून नेले.
त्यानंतर आरोपी पुन्हा ५ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता फिर्यादी यांच्या दुकानात आला. त्याने सोनेरी रंगाची चैन आणून सोन्याची आहे असे भासवून पुन्हा फिर्यादी यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
आकाश कैलाश वर्मा (वय २८, रा. गांधीपेठ, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी दीपककुमार हरी गुप्ता (वय ४५, रा. दळवीनगर, चिंचवड) याला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.