- अधिकृत लसीकरण केद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण लाभार्थ्याना बुधवारी (दि. ११) रोजी लसीकरण केंद्रांवर एकूण ३०० लाभार्थी क्षमते इतका केला जाईल. त्यापैकी २० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल. पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या २८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
हे डोस सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय आचार्य अत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा, खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या लसीकरण केंद्रांवर मिळतील.
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना १०० क्षमते इतका केला जाईल. त्यापैकी २० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने केले जाईल. पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पिं.चिं.म.न.पा. मार्फत लसीकरणाबाबत एस.एम.एस. संदेशप्राप्त झालेल्या ८० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल.
हे डोस प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती, इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल नवीन भोसरी रुग्णालय कासारवाडी दवाखाना अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ प्रेमलोक पार्क दवाखाना या लसीकरण केंद्रांवर मिळतील.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ११/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट,बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने दि. ११/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.
















