- ट्रक व टेम्पोचे नुकसान; बळजबरीने पैसे काढून घेण्याचाही प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे पाच जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने तोडफोड केली आहे. यात, १० वाहनांचे नुकसान झाले असून काही जणांच्या खिशातून आरोपींनी बळजबरीने पैसे काढून घेतले आहेत. ट्रक आणि टेम्पोचा समावेश आहे.
ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. रबलजेदंसिंग जागरसिंग सोही (वय ४५, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोकोबा शिंदे, यश हरी घोंगडे, संदीप प्रेमचंद गोलेछा, आकाश उर्फ छोट्या खडका आणि तुषार शेंडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.


















