- राज्य शासनाचा आदेश प्राप्त होताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचा खर्च पालिका करीत असते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रतिमतदार १० रुपये खर्च निश्चित केला आहे.
महागाई वाढल्याने यंदा खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. वॉर्ड फेररचना करणे, त्यावर हरकती व सूचना घेणे, मतदारपत्रिका, जनजागृती, मतदान प्रक्रिया, मतदार यादी छपाई, मतदानकेंद्रांची उभारणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भत्ते, आहार आदींसाठी पालिकेने सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद केली आहे. खर्च वाढल्यास पालिकेस अतिरिक्त निधी वर्ग करावा लागणार आहे.
संभाव्य नव्या वॉर्डरचनेनुसार तयारीच्या दृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचे नियोजन केले आहे. राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली जाईल.
– मा. बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग…