- दोन अज्ञातांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- जय गणेश साम्राज्य चौकातून गंधर्वनगरीकडे स्वतःच्या रिक्षाने जात असताना दोन अज्ञातांनी फिर्यादीला अडवून फिर्यादीसह रिक्षाचे अपहरण केले. आरोपींनी फिर्यादीला डुडुळगाव चौकातून इंद्रायणी नदी काठावर नेऊन मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने नदीच्या काठावर सोडले.
त्यांचा दहा हजारांचा मोबाईल, रोख पाचशे रुपये व एक लाख वीस हजारांची (एम एच १४ / एच एम ८५४३) रिक्षा चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. १२) रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला.
प्रसाद नवनाथ रेनगडे (वय २२, रा. ताथवडे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.