न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- मोशीतील स्पाईन मॉलमध्ये पहिल्या मजल्यावरील इमारतीत कर्तव्यावरील सुरक्षा रक्षकाच इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
प्रवीण चंद्रकांत जाचक (वय २८, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. १२) पहाटे चार ते पाचच्या दरम्यान घडला. एमआयडीसी भोसरी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मॉलमधील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.