- पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना शिक्षा..
- बेजबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करा – मच्छिंद्र तापकीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑगस्ट २०२१) :- पावसाचे दिवस सुरु असल्यामुळे संसर्गजन्य आजाराचा पिंपरी चिंचवड शहरात प्रसार सुरु झाला आहे. शहरात डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या वाढतेय. याला बहुतांशी शहरातील कासवगतीने सुरु असलेली विकासकामे आहेत.
अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरु असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून डासांची उत्पती होत आहे. यामुळे संसर्गजन्य आजाराला निमंत्रण मिळतेय. नागरिक घर व परिसर स्वच्छ ठेवतात मात्र, पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिक आजारी पडत आहेत.
याला जबाबदार पालिका अधिकारी व ठेकेदार आहेत. अशा ठेकेदारांची कामे थांबविण्यात यावीत, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
















