- आरोपी वाकड पोलिसांकडून ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- मोबाईल शॉपीमध्ये पिस्तूल आणलं यामुळे तरूण संतापला होता. इथं पिस्तूल कशाला आणलंस?, मी पोलिसांना सांगतो असं तो आरोपीला म्हणाला. यावरून आरोपीने कोणताही विचार न करताच तरुणावर त्याच पिस्तूलातून गोळी झाडली.
गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. दोघेही मित्र होते. आरोपीकडे विनापरवाना पिस्तूल होते. ते मयत तरुणाला माहीत होते. यात, १५ वर्षीय ओवेज इसाक इनामदार या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.
२४ वर्षीय किरण वसारे असे आरोपी मित्राचे नाव आहे. किरणला वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.अगोदर हा प्रकार चुकून गोळी सुटल्याचा वाटत असतानाच तपासामध्ये हा खून असल्याचं निष्पन्न झालं.