- ‘युवा मोर्चा – युवा वॉरियर्स‘ कडून राष्ट्रीय एकता, अखंडता व सामाजिक सुरक्षेचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘भारतीय जनता युवा मोर्चा – युवा वॉरियर्स‘ च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायकल रॅलीला भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे, भाजपा जिल्हा प्रवक्ते अमोलजी थोरात, जिल्हा सरचिटणीस नगरसेवक मोरेश्वरजी शेडगे, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी झेंडा दाखवला व रॅलीची सुरवात झाली.
या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय महामंत्री वैभव सिंह, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, भाजयुमो प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजयुमो प्रदेश क्रिडा विभाग संयोजक जयदेव डेंब्रा, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे,भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस तेजस्विनी कदम, सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक अमित गुप्ता, विद्यार्थी विभाग पश्चिम महाराष्ट्र संयोजक राजदीप तापकीर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सोशल मीडिया सदस्या पूजा आल्हाट, अमित देशमुख, राजेश राजपुरोहित, सागर घोरपडे, सुमित घाटे, विक्रांत गंगावणे, प्रियांका शाह, सारिका माळी, प्रथम सकपाळ, शुभांगी कसबे, श्रेया सावंत, पराग जोशी, सुखदेव खिल्लारी यांच्यासह भाजयुमो पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान पिंपरीतील आंबेडकर चौक, चिंचवड स्टेशन व चिंचवडगावातील चापेकर चौकातील शक्तीस्थळ येथे भारत मातेचा जयघोष करून, तिरंग्याला अभिवादन करीत रॅलीचा समारोप झाला. प्रसंगी सर्व सायकलपटूनी त्यांचे सायकलिंग क्षेत्रातील विविध अनुभव सांगितले.आबालवृद्धांनी उदंड प्रतिसाद देत सायकल चालवण्याचा आनंद लुटला. विविध वयोगटातील व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग हे या सायकल रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.
राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सामाजिक सुरक्षा हा संदेश घेऊन भारतातील प्रत्येक जिल्ह्यात भाजयुमोकडून अशा स्वरूपाची सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती युवा वॉरियर्सचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी दिली.