- काळेवाडीतील घटना; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून व्हाट्सअपद्वारे संपर्क करून ई बाईक सायकलच्या सहा योजनांमध्ये दहा हजार रुपये भरल्यास ९० दिवसात पाच लाख ८५ हजार रुपये मिळतील असे जास्त रेफरल बोनसचे आमिष दाखवले. आरोपींनी संगणक साधनसामग्रीचा वापर करून खोटी वेबसाईट तयार केली. ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे फिर्यादी यांना रक्कम भरण्यास प्रवृत्त केले.
आरोपींनी रेझरपे या पेमेंट गेटवेचा वापर करून नेट बँकिंग, फोन पे, गुगल पे द्वारे फिर्यादी यांना १४ लाख ९६ हजार ५८८ रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. ९० दिवसात बोनससह रक्कम परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केली . ही घटना काळेवाडी येथे घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
संतोष बाळू गराडे (वय ३०, रा. विजयनगर काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय प्रताप, राजेश शर्मा (दोघे रा. गुडगाव), निलेश कुमार कोठारी (रा. द्वारका) आणि एका चिनी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.