- शहरात आज ८५ जणांना बाधा; दोघांचा मृत्यू तर, १६८ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज सोमवारी (दि. १६) रोजी ८५ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २६७२५३वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २६१९२९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४३७८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०२ एवढी आहे.