- सहा जणांच्या विरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- साईटवरील फायर फिटिंगचे काम आरोपींनी केले. त्या कामाचा उर्वरित हिशोब आरोपींनी व्यवस्थित दिला नाही. याबाबत फिर्यादी यांनी आरोपींकडे विचारणा केली असता आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांना हाताने, लाथा बुक्क्यांनी, बेल्ट आणि बुटाने मारहाण केली. शिवीगाळ करत मुकामार देऊन जखमी केले.
ही घटना १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास सोनिगरा ज्वेलर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ह्यू इंडस्ट्रीज, चिंचवड येथे घडली. संदेश ऋषभकुमार गंगवाल (वय ४९, रा. मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कॉन्ट्रॅक्टर दत्तात्रय सूर्यवंशी, दत्तात्रय सूर्यवंशी याची पत्नी, मेव्हणा, दोन मुले (सर्व रा. आकुर्डी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.