- विभागप्रमुखांना ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- महापालिकेच्या एकूण १७५ लिपिक पदांना मंजुरी आहे. त्यापैकी १६३ पदे भरली असून, उर्वरित १२ पदे रिक्त आहेत. डिसेंबर २०२१ अखेर एक लिपिक निवृत्त होणार आहे. लिपिकांच्या एकूण १३ पदांसाठी भरती पदोन्नतीद्वारे केली जाणार आहे.
पालिकेच्या सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियमानुसार लिपिक पदाची नामनिर्देशनाद्वारे / सरळसेवाद्वारे ७५ टक्के आणि पदोन्नतीसाठी २५ टक्केअशी नेमणुकीची टक्केवारी निश्चित केली आहे.
लिपिक पदासाठी एकूण १७५ मंजूर पदे असून त्यापैकी १६३ पदे भरण्यात आली आहेत. लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा आणि एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात विभागप्रमुखांनी ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा, अशा सूचना प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी केल्या आहेत.