- भरीव विकासकाम दाखवा अनं १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जिंका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विकासाची पोलखोल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास ११ हजार ११ बक्षीसाची घोषणा देखील करण्यात आली.
या घोषणेला काही तास होत नाही. तोच आता भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी देखील अशाच प्रकाराची घोषणा केली असून राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा आणि तिघा जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
या अभिनव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या दोन्ही स्पर्धांमधून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सामना पुणेकरांना पाहण्यास मिळत आहे.