- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- आमदार महेश लांडगे युवा मंच व दिनेशभाऊ यादव मित्र परिवार यांच्या वतीने वाहतूक सेवा सप्ताहानिमित्त कुदळवाडी, चिखली भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (दि.१८) ते २४ ऑगस्ट २०२१ दरम्यान चिखली भैरवनाथ मंदिर येथे कुदळवाडी मनपा शाळेजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते करण्यात आले.
सकाळी १० वाजल्यापासून दुपारी तीन पर्यंत हे शिबीर होणार आहे. “डोळे” हा शरीरातील महत्वाचा घटक आहे. दृष्टी कमजोर असल्याने तसेच वेळीच उपाय न केल्याने अनेक अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच अनेक सामान्य नागरिकाला खर्च परवडत नसल्याने ते उपचार घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर वाहतूक सेवा सप्ताहाच्या निमिताने आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले असल्याचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी सांगितले. शिबिरासाठी येताना वाहन परवाना घेऊन येणे आवश्यक असून कुदळवाडी, चिखली परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन यादव केले आहे.