- गंभीर जखमी झाल्याने मृत्यू; पतीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- सिक्युरिटी गार्डची नोकरी करणारा राहुल हा त्याची पत्नी गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच तिच्याशी भांडण करीत होता. त्यातून चिडून त्याने लोखंडी कोयत्याने गौरीवर वार केले.
यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पुनावळे येथे मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. गौरी राहुल प्रतापे (वय २१, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
नवनाथ रामदास बोरगे (वय ३२, रा. विजयनगर, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १८) फिर्याद दिली. याप्रकरणी पती राहुल गोकुळ प्रतापे (वय ३०, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.