न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जाने.) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यमुनानगर, निगडीच्या विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. प्राचार्य सतीश गवळी यांच्या संकल्प नेतील भिंतिपालिकडील शाळा अंतर्गत या उपक्रमात प्रशालेतील प्रतिनिधिक १० विद्यार्थी आणि शिक्षक यांनी यात सहभाग घेतला. गृहखात्यातील कामकाजाची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त प्रशासनातील कामकाजाची पद्धत व माहिती व्हावी आणि पुढील जीवनात या गोष्टीचा फायदा व्हावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कक्षात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रसंगी प्राचार्य सतीश गवळी यांनी प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व संस्थेची आणि शाळेची पूर्ण माहिती दिली.
यावेळी पोलीस आयुक्तांना विद्यार्थांनी विविध प्रश्न विचारले
प्रश्न : यात सर तुमचे शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले?
– माझे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. परंतू, तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून घेतले पाहिजे.
प्रश्न : आजची तरुणाई गैरवर्तन किंवा गुन्हे करतात ते थांबवण्यासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल?
– वारंवार पोलिसांकडे तक्रार करावी.
प्रश्न : आपले कार्यक्षेत्र किती आहे?
– चाकण ते हिंजवडी एवढे कार्यक्षेत्र आहे.
प्रश्न : तुम्ही पिंपरी चिंचवड या शहराचा कारभार कसा संभाळता? लोकांचा तूम्हाला प्रतिसाद कसा मिळतो?
– शहराचे कामकाज सांभाळण्यासाठी आमची सर्व सहकारी मंडळी आहेत. तुमच्यासारख्या लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळतो.
प्रश्न : या पोस्टसाठी तुम्ही कोणते शिक्षण घेतले?
– मी यासाठी IPS चे शिक्षण घेतले.
प्रश्न : तुम्ही गुन्हेगारी कशी आटोक्यात आणता?
– माझे सर्व सहकारी अधिकारी यांच्या सहकार्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात येते.
प्रश्न : तुम्ही सर्व ठिकाणी तक्रार पेटी बसवली आहे याने गुन्हेगारी आटोक्यात आली का?
– पूर्णपणे नाही, पण आधिपेक्षा कमी प्रमाण आहे.
प्रश्न : तुमच्यापुढे आदर्श कोण होते?
– माझ्यापुढे आदर्श सर्व त्या वेळेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी होते. परंतु, कोणतेही राजकीय नेते नव्हते.
अशा पद्धतीचे अनेक प्रश्न विचारले असता, त्यांनी त्याची उत्तरे हसत खेळत विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, संस्थेच्या सहसचिव ज्योत्स्ना एकबोटे व शालासमिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी केले. उपक्रमाचे नियोजन खंडू खेडकर, जयश्री चव्हाण, हनुमंत तापकीर यांनी केले.











