न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जाने.) :- मांडूळ शेतकऱ्यांचा मित्र आहे. गुप्तधनाचा शोधक असल्याच्या अंधश्रद्धेपोटी व इतर गैरसमजुतींमुळे “मांडूळ’ या बिनविषारी सापाची राज्यात बेसुमार तस्करी सुरू आहे.
गेल्या काही वर्षांत या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्याच्या तस्करी आणि अंधश्रद्धेमुळे हा साप नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रस्त्यावर मोशी येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.












