- घरभाडे मागितल्याचा आला राग; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ सप्टेंबर २०२१) :- इमारतीमध्ये भाड्याने राहणाऱ्या आरोपीकडे मागील आठ महिन्यांचे घरभाडे थकल्याने ते मागण्यासाठी पोरे आणि त्यांचा मुलगा सौरभ गेले. पैसे मागितल्याचा राग आल्याने कुटुंबाने त्यांना आणि त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर बोलावलं. टेरेसवर शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून सौरभला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले.
यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २९ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजता सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडली. सचिन शिवदास पोरे (वय ५० , रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी गुरुवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय पाटोळे, त्याची पत्नी, मुलगी आणि साहिल विजय पाटोळे (सर्व रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.