न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बोपखेल (दि. १३ जाने.) :- रामनगर बोपखेल येथील कु. शैलेश राजेंद्र पवार यांनी चेस बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळविल्याबद्दल आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी विशेष गौरव केला.
त्रिपुरा आगरतळा येथे ही स्पर्धा झाली होती. चेस बॉक्सिंग या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी नोंदविण्याचा संकल्प शैलेश पवार याने व्यक्त केला. याप्रसंगी दक्षता समिती सदस्य रवि कोवे, प्रतिक्षा घुले, मुकेश जिनवाड, श्याम मेवाती, राजेंद्र पवार, अनिल पारचा, बॉक्सिंग कोच सचिन धोत्रे आदी उपस्थित होते.











