न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १३ जाने.) :- चिंचवड येथील केशवनगर प्राथमिक शाळेत शनिवार (दि. १२) रोजी महास्वच्छता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता स्वच्छ भारत अभियानांतर्गत महास्वच्छता फेरी काढण्यात आली होती. स्वच्छता फेरीचे उद्घाटन प्रभागाच्या नगरसेविका व शिक्षण समिती सदस्या अश्विनी चिंचवडे व नगरसेवक सुरेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. महास्वच्छता फेरी गांधी पेठ, चापेकर चौक, भोई आळी, भीमनगर, शिवाजी उदय मंडळ यामार्गे काढण्यात आली. या फेरीमध्ये इ. ३ री ते ७ वी चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
शाळेतील बालवीर पथकाने चौका-चौकात स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. स्वच्छता फेरी आनंदीबाई डोके उद्यानाजवळ आल्यावर नगरसेविका अपर्णा डोके यांनी महास्वच्छता फेरीचे स्वागत केले. या प्रसंगी मुलांनी स्वच्छतेविषयी घोषणा दिल्या.
यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, विठ्ठल भोईर, मोरेश्वर शेडगे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हगवणे मॅडम व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तिटकारे सर उपस्थित होते. कार्यक्रम संयोजन देशपांडे, जाधव, बागडे, शेंडगे, समुद्र, कामथे, आर्वीकर यांनी नियोजनबद्ध केले.
मुलांचे सादरीकरण पाहून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मुलांना खाऊचे वाटप केले आणि कार्यक्रमाची सांगता स्वच्छतेची शपथ घेऊन झाली.











