न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जाने.) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत गुरुवार (दि. १०) रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. जंगलातील एक उदाहरण देत धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता.
या टीकेला शिवसेनेचे तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे संपर्कप्रमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ”लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर उपसणाऱ्या बोकडाच्या आवलादीप्रमाणे उलटणाऱ्या विरोधी पक्षनेत्याने शिवसेनेला सल्ला देऊ नये. ज्यांनी स्वतःच्या बोटाला धरून राजकारण व समाजकारण शिकवलं त्या गोपीनाथ मुडे साहेबांच्या पाटीत खंजीर खुपसण्याचे काम विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले आहे.”
धनंजय मुंडेनी स्वतःच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या घडाळ्याकडे लक्ष द्यावे. बऱ्याच दिवसांपासून त्या घड्याळात १०:१० मिनीटच दिसत आहे. त्या घड्याळामधील सेल गेला असल्यास टाकुन घ्यावा. आपल्याकडे जिल्हा बँकेत केलेल्या घोटाळ्यातील रक्कम शिल्लक नसल्यास, शिवसैनिकांकडे मागवावी, असा जोरदार पलटवार दाखले यांनी मुंडेंच्या विधानाचा वेध घेताना व्यक्त केला आहे.












