न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. १४ जाने.) :- निगडी-विद्या प्रसारणी सभेच्या व्ही.पी.एस संस्थेच्या शिक्षिका सुनीता सपाटे यांना पुणे म.न.पा. च्या वतीने नुकताच कै. यशवंतराव चव्हाण गुणवंत आदर्श शिक्षिका पुरस्कार महापौर मा. मुक्ता टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे स्वरूप शॉल, श्रीफळ, ट्रॉफी व रोख रक्कमेचा समावेश आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सदरचा पुरस्कार पुणे मनपाच्या वतीने दरवर्षी दिला जातो.
सुनिता सपाटे यांनी केंद्र सरकारच्या वतीने घेतली जाणारी प्रशिक्षणे दिल्ली आणि हैदराबाद येथे यशस्वीपणे पूर्ण केले असून, आतापर्यंत विविध सामाजिक संस्था आणि संघटनाच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे.